पेट्रोल पंपवारील सुरक्षारक्षकाला कुऱ्हाडीने मारहाण करीत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री नऱ्हेतील भूमकर चौकाजवळ असलेल्या व्ही के डी पेट्रोलपंपावर घडली. मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. तर,मारहाण करणारे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.
हेही वाचा – पुणे : पत्नीला अश्लील संदेश पाठविणाऱ्या मेहुण्याचा खून ; दाम्पत्यासह चौघे अटकेत
सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत तिघे जण जखमी झाले आहेत. चोरट्यांनी येथून २० हजारांची रोकड चोरुन नेली. माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपीचा शोध सुरू केला आहे.