पुणे : रेसकोर्स परिसरातील सोपानबागेतील एका बंगल्यातून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचे परदेशी चलन, हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा – लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात चीनविषयक परिषद
हेही वाचा – वारजेतील खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’
याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एका शाळेचे संस्थापक आहेत. घोरपडी परिसरातील सोपानबागेत त्यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बंगल्यातील साहित्य वरच्या मजल्यावर हलविण्यात आले आहे. बंगल्याचे नुतनीकरण कामगारांकडून करण्यात येत आहे. बंगल्यातील कपाटातून साडेचार लाख रुपयांचे परदेशी चलन आणि हिरेजडीत दागिने असा ऐवज लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करत आहेत.