पुणे-नाशिक रस्त्यावर मोशी येथे हमरस्त्यावर असलेल्या सराफाच्या दुकानावर गुरुवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी दरोडा टाकला असून साडेनऊ किलो चांदीसह रोख ऐवज घेऊन पोबारा केला आहे. मोशी येथे नुकतीच यात्रा झाली व लगेचच झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
मोशी येथे महामार्गावर ‘न्यू ओमकार ज्वेलर्स’ हे दुकान आहे. तेथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. भिंतींना भगदाड पाडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला व तिजोरी उघडून ८ किलो चांदी तसेच रोख रक्कम लुटून नेली. दुकानाचे मालक प्रशांत दहिवळ यांना सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे व पथक घटनास्थळी आले. त्यांनी दुकानाची व संपूर्ण परिसराची तपासणी केली. दुकानाच्या आजूबाजूला अवजड वाहने उभी राहतात. त्यामुळे दुकान पूर्णपणे झाकोळून जाते. या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही व धोक्याची घंटा असलेली यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत होती, असे पोलिसांच्या निदर्शनास आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंटे करत आहेत.
सराफाच्या दुकानाला भगदाड पाडून मोशीत साडेनऊ किलो चांदी लंपास
पुणे-नाशिक रस्त्यावर मोशी येथे हमरस्त्यावर असलेल्या सराफाच्या दुकानावर गुरुवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी दरोडा टाकला असून साडेनऊ किलो चांदीसह रोख ऐवज घेऊन पोबारा केला आहे. मोशी येथे नुकतीच यात्रा झाली व लगेचच झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

First published on: 15-03-2013 at 02:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery of 9 500 kg silver in moshi