इलेक्ट्रीकचे काम करण्यास टाळाटाळ करतो म्हणून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्या जवळील एटीएम मधून पैसे काढून मोटार चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीप्रसन्न मधुसुदन देवनाथ (वय २९, रा. वडारवाडी हौसिंग सोसायटी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अमोल वीटकर व इतरांविरुद्ध अपहरण, जबरी चोरी, मारहाण, धमकावणे या कलमाअनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवनाथ आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच ठिकाणी राहण्यास आहेत. २६ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास आरोपींना देवसास यांना आमचे काम करायला टाळाटाळ करतो म्हणून त्यांच्या मोटारीत जबरदस्तीने बसले. त्यांना रिव्हॉल्वर व चाकू धाक दाखवून कात्रज, सासवड, नारायपूर अशा विविध ठिकाणी फिरविले. त्यांच्याकडील मोबाईल, सहा एटीएम कार्ड जबरदस्तीने हिसकावून घेतले. टिळक रस्त्यावरील एटीएममधून दोन वेळा वीस हजार काढले. त्यांना रस्त्यावर सोडून त्यांची मोटार आणि इतर माल असा एकूण पाच लाख सत्तर हजार रूपयांचा ऐवज घेऊन पळून गेले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एन. बी. देवकरे हे अधिक तपास करतोहेत.