पुणे : लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे. आधी रोबोच्या मदतीने होणाऱ्या या शस्त्रक्रिया आता अधिक अचूकपणे आणि जास्त चिरफाड न करता संपूर्णपणे रोबोद्वारे होऊ लागल्या आहेत. पुण्यातील ५२ वर्षीय आणि १६५ किलो वजनाच्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘दा विंची एक्स रोबो’च्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ही गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. आधी काही प्रमाणातच रोबोचा वापर या शस्त्रक्रियेत केला जात होता. परंतु ही शस्त्रक्रिया संपूर्णपणे रोबोद्वारे केली गेली. शस्त्रक्रियेदरम्यान रोबोटिक स्टेपलर आणि वेसल सीलर्सचा वापर करून अधिक अचूकता साधण्यात आली. याचबरोबर शल्यचिकित्सकांवरील ताणही कमी केला गेला. लठ्ठ रुग्णांमध्ये पोटाच्या भिंतीची जास्त जाडी पारंपारिक लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये अडथळा आणू शकते. याला यशस्वीरित्या हाताळण्यासाठी ही प्रगत पद्धत विशेषतः महत्त्वाची ठरली. ही शस्त्रक्रिया फक्त दोन तासांत पूर्ण झाली.

हेही वाचा – ‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

u

पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये बॅरिएट्रिक शल्यचिकित्सक डॉ. नीरज रायते आणि डॉ. सतीश पट्टणशेट्टी ही शस्त्रक्रिया केली. रुग्णाला मधुमेह, गुडघेदुखी, उच्च रक्तदाब आणि झोपेचे विकार यांसह विविध आरोग्य समस्या होत्या. शस्त्रक्रियेनंतर केवळ दोन दिवसांत रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला विशिष्ट दिनचर्या देण्यात आली. त्यानुसार सांगितलेला आहार, औषधे घेणे आणि काही आठवड्यांसाठी जड व्यायाम किंवा वजन उचलणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला.

हेही वाचा – काश्मीर खोऱ्यातील तरुणही आता रोजगाराभिमुख, पुण्यातील संस्थांचा लष्काराच्या मदतीने पुढाकार

रोबोटिक बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला लेप्रोस्कोपिक प्रक्रियेच्या तुलनेत कमी वेदना जाणवल्या. या प्रणालीच्या अचूकतेमुळे रक्तस्राव कमी झाला आणि रुग्ण बरा होण्याचा कालावधीही पर्यायाने कमी होण्यास मदत झाली. – डॉ. नीरज रायते, बॅरिएट्रिक शल्यचिकित्सक