‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी आज महाविद्यालयीन तरुणांना मिळणार आहे. मालिकेतील कलाकार अभिनेते सुव्रत जोशी, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर आणि सखी गोखले कॉन्सर्टसाठी उपस्थित राहतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.‘सारेगमप’ या कार्यक्रमातील मागील पर्वाची विजेती जुईली जोगळेकर आणि सहकाऱ्यांचा ‘अगम्य बँड’ या वेळी सादरीकरण करेल. गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कॉन्सर्टची प्रसिद्धी गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयांमध्ये सुरू असून महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि कार्यक्रमाची प्रवेशिका घेतलेले विद्यार्थी त्याचा आनंद घेऊ शकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rock concert of tv serial dil dosti duniadari