पुणे : राज्यातील महिला वर्गावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असून राज्य सरकारने महिलांना संरक्षण द्यावे,या मागणीसाठी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, पुणे शहरात तरुणी,महिला यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे. काही वर्षापूर्वी पुणे तिथे काय उणे अशी म्हण होती,पण आता पुणे तिथे नुसतेच गुन्हेच गुन्हे अशी म्हणायची वेळ आली आहे.त्यामुळे आता पुणे शहराच नाव गुन्हे ठेवण्यास काही हरकत नाही.तसेच महाविकास आघाडी सरकारने च्या काळात शक्ती कायदा करण्यासाठी विशेष पावल उचलण्यात आली होती.मात्र सध्याच सरकार त्या कायद्याबाबत कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही, जर शक्ती कायदा अमलात आला तर महिला वरील अन्याय अत्याचार रोखण्यास मदत होईल आणि न्यायालयात प्रलंबित गुन्हे मार्गी लागण्यास मदत होईल,मात्र आता या सरकारचे महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही.केवळ निवडणुका आल्या की लाडकी बहिण योजना आठवली,पण आहो या लाडक्या बहिणीच्या संरक्षणाचे काय असा सवाल उपस्थित करीत महायुती सरकारला त्यांनी टोला लगावला.

महिलांच्या प्रश्नावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या कुठे कमी पडतात का त्या प्रश्नावर रोहिणी खडसे म्हणाल्या,महिलांच्या प्रश्नावर त्या नक्कीच कमी पडत आहेत.त्या केवळ चांगला मेकअप करून,पक्षाच्या कामात नुसत मटकायचं, काम करतात.राज्यात घडलेल्या घटनांवर त्यांच् कधी ही विधान आलेल नाही.तसेच काल गुलाबराव पाटील यांनी एक विधान केल,त्यावर रूपाली चाकणकर यांनी एक ही विधान केल नाही.त्याच बरोबर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांवर महिला अत्याचारा बाबत गुन्हे दाखल आहेत.पण तरी देखील रूपाली चाकणकर या त्यावर बोलत नाही किंवा राजीनाम्याची मागणी करित नाही. सर्वांना त्या पाठीशी घालण्याच काम करीत आहेत. त्यामुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आयोगाच्या अध्यक्षा नसून त्या केवळ सत्ताधारी पक्षाच्या आयोगाच्या अध्यक्षा आहेत,अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.आता या टीकेला रूपाली चाकणकर काय उत्तर देतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

Story img Loader