सावित्रीबाई फुले विद्यापीठात रॅप साँग चित्रीकरण करण्यावरून वाद सुरू आहे. त्यातच चित्रीकरणास दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ आज ( २४ एप्रिल ) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ( अभाविप ) कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार आंदोलन केलं. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून घोषणाबाजी केली. तसेच, आंदोलकांनी कागदपत्रे फाडून ते उधळतानाच विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या आहेत.

अभाविपच्या विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली. या राड्यामुळे कुलगुरूंनी बैठक थांबवली. या राड्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निषेध केला आहे. “धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार?”, असा संतप्त सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.

हेही वाचा : शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “रॅपसाँग प्रकरणी चौकशी आहे. तरी मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात धुडगूस घालत केलेल्या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध!”

हेही वाचा : “मी फकीर, मग झोळी लटकवून…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले…

“एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार?,” असा सवाल रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे.

Story img Loader