बंडखोर राहुल कलाटे हे अहंकाराची भाषा बोलत आहेत. त्यांना वीस हजार मते पडतील. नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत असा हल्लाबोल राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आले होते.

रोहित पवार म्हणाले की, नाना काटे हे प्रचंड मतांनी विजयी होतील. जगताप कुटुंबा बद्दल नागरिकांमध्ये सहानुभूती आहे. पण, भाजपाला आम्ही मत देणार नाही उलट राष्ट्रवादीला निवडून आणणार असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये आहे. अजित पवार यांनी केलेला विकास हे नागरिक विसरले नाहीत. पुढे ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष हे काहीही बोलले तरी खरे होणार आहे का? उलट राष्ट्रवादी चा उमेदवार निवडून येईल आणि प्रदेशाध्यक्ष यांना झटका बसेल. वंचितमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिले आहे. भाजपा संविधानाच्या विरोधात आहेत. तसे बघायला गेल्यास वंचित देखील भाजपा विरोधी पाहिजे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Colonial hegemony through technological superiority
तंत्रकारण: तांत्रिक श्रेष्ठतेतून वसाहती वर्चस्ववाद
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
supriya sule latest news
“असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!
challenge for new guardian minister pankaj bhoyar is to manage equal colleagues
नव्या पालकमंत्र्यास समतुल्य सहकारी सांभाळण्याचेच आव्हान

हेही वाचा >>> कसब्याच्या लढाईसाठी मुख्यमंत्रीही रणांगणात

वंचित चा फायदा भाजपाला होतो हे लोकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना कळते. त्यांचे कार्यकर्ते हुशार आहेत. भाजपाला मदत होईल असे काम ते करतील असे मला वाटत नाही. पुढे ते म्हणाले की, राहुल कलाटे हे वीस हजारांच्या पुढे जाणार नाहीत. ते जे आज बोलत आहेत ते अहंकाच्या भाषेत ते बोलत आहेत. लोकं अहंकार स्वीकारत नसतात असा टोला त्यांनी राहुल कलाटे यांना लगावला आहे. राष्ट्रवादी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पार्थ पवार येणार का? या प्रश्नावर बोलताना रोहित म्हणाले की, माझे त्यांच्याशी बोलणे झाले नाही. पण, त्याचे वडील (अजित पवार) प्रचारात असतील तर मुलाचा काय विषय असे रोहित पवार म्हणाले आहेत.

Story img Loader