लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस एकच पार्टी आहे. स्वहित, स्वार्थी राजकारणासाठी काहीजण तिकडे गेले आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेकांना कमळावर लढावे लागेल अशी परिस्थिती होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आम्ही शेवटपर्यंत भाजप विरोधात लढू असेही ते म्हणाले.

पिंपरीत बोलताना पवार म्हणाले, निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे आयोग आम्हाला चिन्ह, नाव देणार नाही. पण, आमच्याकडे पवार साहेब आहेत. त्यामुळे आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत. भाजप लोकनेत्यांना संपवते. तिकडे गेलेल्या आमच्या नेत्यांनाही हळूहळू संपवतील. भाजपला लोकसभा निवडणुकीचे पडले आहे. त्यांना बाकी काही देणेघेणे नाही.

आणखी वाचा-आमदार रोहित पवार म्हणाले, “अजित पवार गटातील अनेकजण संपर्कात, काहीजण गेले ते…”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नेत्यांना संपूर्ण अधिकार होते. पत्रकार परिषदेतही तेच बोलत होते. त्यांचा अंतिम अधिकार, निर्णय असायचा. आता त्यांना तेवढे अधिकार असल्याचे दिसत नाही, असेही पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar criticizes ajit pawar pune print news ggy 03 mrj