पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात दादांनी येरवड्यातील पोलीस खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितल्याचा आरोप केला. तसेच त्याला त्यांनी विरोध केल्याचंही नमूद केलं आहे. मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातील मुद्दे समोर येताच राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांच्या दौऱ्याचा धडाका! चुलते-पुतणे असे राजकारण सुरू झालं आहे का?

हेही वाचा – आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीचे समर्थन करीत नाही – आमदार रोहित पवार

मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामधून अजित पवार यांच्यावर जमिनी देण्यावरून गंभीर आरोप केले आहेत. त्याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी स्वतः बांधकाम क्षेत्रात नाही. त्यांनी काय आरोप केले मला त्याबद्दल सांगता येणार नाही. जमीन कोणाची कोणाला दिली, त्या जमिनीचे काय केले त्याबद्दल सरकारने शहानिशा करावी. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar indirectly targeted ajit pawar svk 88 ssb
Show comments