पिंपरी चिंचवड : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी देशाच्या सीमेवरील सुरक्षा वाढवावी लागेल. असं विधान करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. भारता बाहेरील व्यक्ती येऊन मोठ्या व्यक्तीच्या घरी चोरी करून इजा पोहोचवत असेल तर सर्वसामान्य नागरिक सुखरूप नाहीत. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
अभिनेता सैफ अली खान वर चाकूने हल्ला करण्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर अज्ञात व्यक्ती हा चोरीच्या उद्देशाने आल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सैफअली खान सारख्या मोठ्या व्यक्तीच्या घरी चोर येऊन त्यांना इजा पोहोचवत असेल तर सर्वसामान्य नागरिक सुखरूप नाहीत.
आणखी वाचा-पुणे: विवाहाच्या आमिषाने फसवणुकीमुळे डॉक्टर तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील आणि परराज्यातील लोकसंख्येचा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील जनता आणि परराज्यातील जनता किती? असं म्हणत रोहित पवार यांनी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. भारताबाहेरील व्यक्ती येऊन हल्ले करत असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. असं मत देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलं. केंद्राने देखील दक्षता घ्यावी अस आवाहन केलं आहे. परराज्यातील लोकांमुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत. हे देखील अधोरेखित केलं आहे.