देशासह महाराष्ट्रातही लोकसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरली. बंडखोरी, बेरोजगारी, अरक्षणासह अनेक मुद्यांना विरोधकांनी हत्यार बनवून सत्तारूढ भाजप प्रणित महायुतीविरोधात वापरले होते, त्यामुळे भाजपला प्रचारात मोठी अडचण झाली होती. तर महाराष्ट्रातील लोकसभेचे निकालही भाजपसाठी काही दिलासादायक नसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात विरोधकांच्या एकत्रित महाविकास आघाडीने महायुतीपेक्षाही अधिक जागा जिंकल्या आहेत. एक्झिट पोलमध्येही कल महाविकास आघाडीच्या बाजून असल्याचे समोर आले होते. आज निकालातही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. दरम्यान या घडामोडींवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली. त्यांनी सुप्रिया सुळे यांचे कौतुक केले.
महाराष्ट्रात निकाल लोकशाहीच्या बाजूने लागला. महाराष्ट्रात सत्ता, ताकद, गुंडगीरी, सर्व बळाचा वापर झाला, तरी लोक महाविकास आघाडीसोबत राहिले, अशी प्रतिक्रिया निकालाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिली.
हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाच्या उमेदवाराला फक्त २०१ मतं, लाजिरवाणा पराभव
निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल रोहित पवार म्हणाले की, आमची ३५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र पैशांची ताकत मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली, त्यामुळे आमच्या अनेक जागा या कमी फरकाने हातून निसटू शकतात, असे वाटत आहे. मात्र लोकांमुळे जो निकाल लागला तो लोकशाहीसाठी चांगला आहे. महाराष्ट्रातही पुढे जाऊन महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार पुढे म्हणाले की, ही विचारांची लढाई होती. भाजपच्या विरोधात आम्ही लढत होतो. सुप्रिया सुळेंचे काम, शरद पवारांचे काम आणि कार्यकर्त्यांचे काम या सर्वांमुळे सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
अठरावी लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली
अठरावी लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली, कारण यंदाच्या निवडणुका या संसदीय निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात तणावपूर्ण निवडणुका ठरल्या. मगाली दोन निवडणुकीत म्हणजेच २०१४ आणि २०१९ या वर्षी भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळवला. यावेळी विरोधकांना आपल्या जागा वाचवण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. मात्र भाजपने भरपूर जागा जिंकून विरोधकांना चांगलेच नाकी नऊ आणले. मात्र, २०२४ च्या लोकसभेत चित्र पलटले. वाढती बेरोजगारी, शेती उत्पन्नाला हमी भाव, अर्थव्यवस्थेची अनिश्चित वाटचाल या प्रश्नांनी केंद्र सरकारला विळखा घातला आणि विरोधकांनी या मुद्द्यांवर सरकारला चांगलेच घेरले, तर कलम ३७०, रामंदिर आणि काही जनकल्याणकारी योजनांच्या आधारावर भारतीय जनता पक्षाणे लोकसभा निवडणुकीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फार यश मिळणार नसल्याचे कयास
भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांना पळवून नेत असल्याचेही आरोप झाले. अनेक ठिकाणी विरोधी पक्षातील प्रभावी नेत्यांनी भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला आणि मोदींच्या कामगिरीची दखल घेत भाजपमध्ये प्रवेश घेतला. महाराष्ट्रात अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मोदींचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये प्रवेश केला. याच महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले. याचाही राज्यातील तसेच लोकसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल असेही कयास लावण्यात आले होते. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी लालू यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपची कास धरली. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फार यश मिळणार नाही असेही कयास लावण्यात आले.