पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करायला मला आवडेल. शरद पवार जे सांगतील, त्यानुसार मी काम करणार आहे. मतदारसंघात दौराही करेल असेही युगेंद्र यांनी सांगितले.
त्यावर पिंपरीत असलेले युगेंद्र यांचे बंधू आमदार रोहित पवार म्हणाले की, युगेंद्र पवार यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. आज कळतेय ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले आहेत. तिथे जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितले ते बघावे लागेल. अजित पवार यांना राजकाराणत पदे मिळत गेली. राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री झाले. त्यांची राजकीय प्रगती कुटुंब म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या डोळ्याने बघितली आहे. व्यक्तिगत जीवनातही पवार साहेबांमुळेच राजकीय प्रगती झाल्याचे अजितदादा सांगत आले आहेत. अशा परिस्थिती अजितदादांनी जो निर्णय सत्तेसाठी किंवा कदाचित आपल्यावर काही प्रमाणात कारवाई होऊ नये यासाठी निर्णय घेतला. तर आम्हाला कुटुंब म्हणून आम्हा सर्वांना निर्णय आवडला नाही.
कुटुंबाला निर्णय आवडला नसेल तर सामान्य लोकांना कसा आवडेल. त्यामुळे योगेंद्र आज तिथे काय बोलतोय, कसे बोलतोय, कोणाच्या बाजुने बोलतोय हे बोलल्यानंतर सर्व कळेल. आम्ही विचारांचे पक्के आहोत. साहेबांसोबत राहणार आहोत, असेही रोहित पवार म्हणाले.
अनिल तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा वाद आजचा नाही. सुनील तटकरे यांनी घरातच पदे ठेवली होती. अनिल तटकरे हे आमच्या संपर्कात होते. आजही आहेत पण त्यांना अजून कोणतेही पद दिले नाही. जयंत पाटील काय आहे ते ठरवतील.
हेही वाचा…लोकजागर : पदपथ की वाहनपथ?
रोहित पवार पुन्हा अजितदादांच्या बालेकिल्ल्यात सक्रिय
पक्षातील फुटीनंतर रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घातले आहे. त्यांचे शहरात सातत्याने दौरे सुरु असतात