दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर यंदाही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडत आहे. परंतु माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या घटनेवर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील या घटनेवरून सरकारला धारेवर धरलं आहे. पवार यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे, तसेच या ट्वीटमध्ये पोलीस वारकऱ्यांवर लाठीचार्ज करत असतानाचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

या ट्वीटमध्ये रोहित पवर यांनी म्हटलं आहे की, आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वारीच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली. राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येणारे काही बोगस वारकरी या सोहळ्यात घुसल्याने खऱ्या वारकऱ्यांवर अन्याय झाला आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचं पाप या सरकारने केलं.

रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, भक्तपरंपरेचा हा सोहळा राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी सरकारने बोगस वारकऱ्यांना आधी दूर ठेवण्याची गरज आहे. नियोजनाच्या नावाखाली मंदिरामध्ये सामान्य वारकऱ्यांना येऊ दिलं जात नसल्याचं आज मीही पाहिलं, त्याचं राजकारण करायचं नाही, पण आता हे अति होतंय. शिवाय लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाहीत का? हे कथित हिंदुत्त्ववादी राज्य सरकारने सांगावं.

हे ही वाचा >> पाच मंत्र्यांच्या गच्छंतीसाठी भाजपचा दबाव; शिंदे गटामध्ये अस्वस्थता मात्र युतीत तणावाचा भाजपकडून इन्कार

आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, अशी घटना विरोधी पक्षाचं सरकार असताना घडली असती तर भाजपाने आणि त्यांच्या कथित अध्यात्मिक आघाडीने तांडव केलं असतं. शिवाय केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर करणाऱ्यांना अध्यात्माची खरी संस्कृती कशी कळणार? हाही प्रश्न आहेच.