पुणे : भाजपाचे नेते तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी रात्री सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते, त्यावेळी शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करित त्यांच्या अंगावर शाई फेकून निषेध नोंदविला. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी पक्षाचे नेता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार पुणे दौर्‍यावर होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या घटनेबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीचे समर्थन करीत नाही आणि ते योग्य नाही. आम्हीदेखील आंदोलन करू शकलो असतो. बसेस जाळू शकलो असतो, पण आम्ही तरुणांच्या प्रश्नावर शांततेच्या मार्गाने युवा संघर्ष यात्रा काढत आहे.

हेही वाचा – पुणे: बनावट प्रमाणपत्रांद्वारे पोलीस दलात भरतीचा प्रयत्न फसला; १० तरुणांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांच्या दौऱ्याचा धडाका! चुलते-पुतणे असे राजकारण सुरू झालं आहे का?

राज्य सरकार तरुणांच्या प्रश्नांची दखल कुठेही घेताना दिसत नाही. मध्यंतरी घाई गडबडीत ११ हजार जणांची कंत्राटी पद्धतीने भरती केली. तसेच पुढील काही महिन्यांत १ लाख जणांची भरती होईल. भरती प्रक्रियेतील कंपन्या सत्ताधारी पक्षातील नेते मंडळींच्या आहेत. त्यांना बलाढ्य करायचे ठरविले आहे. जे युवक अनेक वर्षांपासून पुढे जायचा प्रयत्न करित आहेत त्यांना बाजूला करीत आहेत. त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीवर नोकरीवर घेतल्यावर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने सेवा मिळणार, हादेखील प्रश्न असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar statement on the ink splash on chandrakant patil svk 88 ssb
Show comments