पिंपरी: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली. अजित पवार यांनी रोहित पवार यांना पाडण्यासाठी फोन करत असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला होता. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
“सध्या एक ट्रेंड आला आहे. पवार कुटुंबावर बोललं की मोठं होतं. त्यामुळे शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी केलेल्या आरोपाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. नरेश मस्के यांना पवार कुटुंब हे कधीच कळणार नाही.” असा टोला राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले की, आरोप केलेली व्यक्ती कोणाच्या परिचयाची नाही. जेव्हा ते ठाण्याचे नगराध्यक्ष होणार होते तेव्हा आताच्या नेत्यांनी विरोध केला होता. मग, उद्धव ठाकरे यांनी मदत केली आणि ते नगराध्यक्ष झाले. ते काँग्रेस मध्ये जाणार होते त्यांना उद्धव ठाकरे यांनी थांबवलं. पुढे ते म्हणाले की, सध्या एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. पवार कुटुंबीयांच्या विरोधात बोललं की मोठं होतं. त्यामुळे अशी वक्तव्ये केली जातात. त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्यांनी आरोप केले त्यांना पवार कुटुंब हे कधीच कळणार नाही.
पुढे ते म्हणाले की, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण, निर्णय देत असताना उशीर होत असेल तर कुठं तरी न्याय देण्यास उशीर होतो तेव्हा काही प्रमाणात अन्याय झाल्यासारखं असतं. त्यामुळं कोर्टाला विनंती करतो. लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मला विश्वास आहे की कोर्ट संविधानाच्या बाजूने निर्णय देईल. उद्धव ठाकरे यांची बाजू संविधानाला धरून आहे. निर्णय त्यांच्या बाजूने लागेल असे माझे मत आहे. पुढे ते म्हणाले की, कोर्टाने या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गेल्या नऊ महिन्यात ज्या- ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या खूप घातक आहेत. हे सर्व सामान्य नागरिकांना समजतं.