लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कर्जतचे युवा आमदार रोहित पवार यांनी राज्यात सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. रोहित पवार यांनीच त्याबाबतचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही त्यांनी केली.

राज्यातील युवकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी युवा संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या यात्रेला मंगळवारी (२४ ऑक्टोबर) प्रारंभ झाला होता. ही यात्रा शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पोहोचली असताना रोहित पवार यांनी यात्रा स्थगितीचा निर्णय जाहीर केला.

आणखी वाचा-राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता बहुउद्देशीय संगणक केंद्र, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. राज्यातील आंदोलनाची परिस्थिती आणि युवकांची स्थिती पाहता हा निर्णय घेणे आवश्यक होते. नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही यात्रा लांबविण्यात आलेली नाही. युवकांच्या आत्महत्या होत आहेत. ही परिस्थिती चिंताजनक असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे रोहित यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, युवकांच्या प्रश्नासाठी लढा सुरू आहे. सध्या सर्वत्र राजकारण होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले. पंतप्रधानांबरोबर चर्चा केली. मात्र पंतप्रधान शिर्डीत आले असाताना त्यांनी या मुद्यावर कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. धनगर आणि मराठा समाजाच्या बाबतीत राजकारण केले जात आहे. या यात्रेचा शुक्रवारी सकाळचा टप्पा जिथे संपला तिथेच आम्ही थांबलो आहोत. छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड येथील पदाधिकारी इथे आले आहेत. त्यांच्यासमवेत चर्चा सुरू आहे. अशांत झालेला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत व्हायला हवा. यात्रेची पुढील दिशा चर्चा करून निश्चित केली जाईल, असे रोहित यांनी सांगितले.