तेलंगणातील हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याने २०१६ रोजी आत्महत्या केल्यानंतर देशभरात आंदोलन उभे राहिले होते. रोहित वेमुलाला न्याय देण्यासाठी अनेक आंबेडकरवादी संघटना पुढे आल्या होत्या. या प्रकरणातील ताजी माहिती आता समोर आली आहे. तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाची फाईल आता बंद केली आहे. तसेच सर्व आरोपींना क्लीन चीट दिली आहे. रोहित वेमुला हा दलित नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे. यावरून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्या पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या.

“रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण ही एक अत्यंत दुर्दैवी घटना होती. हे प्रकरण विद्यापीठ पातळीवर अत्यंत संवेदनशीलतेने हाताळता आलं असतं. पण संपूर्ण देशभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्यामुळे सरकारविरोधात वातावरण तयार झालं. हा दबाव स्वार्थी गटांकडून तयार करण्यात आला होता. मोहब्बत की दुकान उघडणाऱ्या लोकांनी हा मुद्दा संसदेतही नेला”, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…
Young man commits suicide after being harassed by moneylender Pimpri chinchwad news
धक्कादायक: “पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा, सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल
Image Of Prakash Ambedkar And Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस तुमचे पोलीस खाते भ्रष्ट झाले आहे”, संतोष देशमुख हत्येच्या तपासावर प्रकाश आंबेडकरांची टीका

“या प्रकरणाला चिघळवू नका असं मी म्हटलं होतं. हे प्रकरण सामंजस्याने विद्यापीठात हाताळता आलं असतं, पण विरोधकांनी देशभरात रस्त्या-रस्त्यावर आंदोलन केलं. हे विद्यापीठ केंद्रीय असल्याने शिक्षणमंत्री आणि सरकारवर आरोप केले गेले. असहिष्णुता, राजकीय हस्तक्षेप आणि द्वेष हे सरकारमध्ये नसून स्वार्थी गटांमध्ये आहे. हे गट उच्च शिक्षणाच्या केंद्रांमध्ये हे विष पसरवण्याची संधी सोडत नाहीत”, अशीही टीका निर्माला सीतारामण यांनी केली.

रोहित वेमुला प्रकरण काय आहे?

हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी रोहित वेमुला याने २०१६ साली आत्महत्या केली होती. याचे पडसाद विद्यापीठासह देशभर उमटले होते. त्यानंतर या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती अशोककुमार रुपनवाल यांच्या एक सदस्यीय अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली. या समितीकडे या प्रकरणी घडलेल्या घटनांच्या नोंदी ठेवण्याचे आणि या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

हेही वाचा >> “रोहित वेमुला दलित नव्हता”, पोलिसांनी केली फाईल बंद, सर्व आरोपींना क्लीन चीट

सिंकदराबादचे खासदार बंडारु दत्तात्रय, विधानपरिषदेचे आमदार एन. रामचंदर राव आणि हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी यांच्यावरील आरोप पुसून टाकत या सर्वांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

उच्च न्यायालयात प्रकरण बंद करण्याबाबत अहवाल सादर करण्यात आला. ज्यामध्ये पोलिसांनी म्हटले की, रोहित वेमुला दलित नव्हता. राहुल गांधी एकदा म्हणाले होती की, रोहित वेमुला दलित असल्यामुळेच त्याची हत्या झाली. तेलंगणा आणि नवी दिल्लीतील डाव्या संघटनांनी रोहित वेमुलाला न्याय देण्यासाठी भाजपाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली होती.

पोलिसांनी आपल्या अहवालात पुढे म्हटले की, रोहित वेमुलाने कुलगुरू अप्पा राव यांना पत्र लिहिले होते. कुलगुरूंनी केवळ विद्यापीठाचे नियम पाळले होते आणि काही पावले उचलली होती.

Story img Loader