पुणे : विमानाच्या सामान कक्षात (चेक-इन लगेज) ठेवायला दिलेल्या सामानातून चोरी होत असेल आणि विमान कंपनी, विमानतळ प्राधिकरण वा विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था यापैकी कोणत्याच यंत्रणेकडे दाद मागता येत नसेल, तर प्रवाशाने जायचे कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे विमानतळावर घडलेल्या एका घटनेने या प्रश्नाला तोंड फोडले आहे.

त्याचे झाले असे, की प्रसन्न नहार (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी) गेल्या १२ जानेवारी रोजी सायंकाळी दिल्लीतून पुण्यात येण्यासाठी निघाले. दिल्ली विमानतळावर विमान कंपनीच्या सामान तपासणी केंद्रात (चेक-इन लगेज) त्यांनी त्यांचे सामान सुपूर्द केले. ते त्यांना पुणे विमानतळावर उतरल्यानंतर मिळाले. सामान मिळाल्यावर, बॅग उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बॅग तपासली असता, त्यातील एक लाख ८० हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांना आढळले. त्यानुसार, त्यांनी पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. विमानतळ पोलीस ठाण्यात त्यांची रीतसर तक्रार दाखल आहे.

pmc to build well equipped fire brigade headquarters to be build in pimpri chinchwad
पिंपरी : अग्निशमन दलाचे सुसज्ज मुख्यालय; संग्रहालय, प्रेक्षागृहा आणि वाहनतळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
Birthright Citizenship, US, Donald Trump,
विश्लेषण : ट्रम्प यांचा ‘बर्थराइट सिटिझनशिप’ संपवणारा आदेश काय आहे? यामुळे भारतीयांमध्ये खळबळ का?
Father of Saif stabbing accused speaks about missing legal documents after the incident.
Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यानंतर हल्लेखोराचा पहिला फोन कोणाला? वडील म्हणाले, “आमचा मुलगा असा…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Ajit Pawar avoided sitting next to Sharad Pawar
शरद पवार यांच्या बाजूला बसणे अजित पवारांनी टाळले, नावाची प्लेट बदलण्यास…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

विमान प्रवास करताना विमानाच्या सामान विभागात एकदा आपले सामान सुपूर्द केले, की ते प्रवाशाला त्याच्या नियोजित स्थळी उतरल्यावरच मिळते. या दरम्यान हे सामान जेथून प्रवाशाने प्रवासास सुरुवात केली, त्या स्थळावरील तपासणी केंद्र ते विमान आणि अपेक्षित स्थळी उतरल्यानंतर विमान ते त्या स्थळावरील सामान केंद्र, असा प्रवास करते. यादरम्यान कुणी सामानातून चोरी केली, तर त्याची जबाबदारी कोणत्या यंत्रणेची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांच्या मते, ‘हवाई प्रवास करताना प्रवासांच्या बॅगेसोबत होणारी छेडछाड, वस्तू-ऐवज चोरीच्या घटनांबाबत सुरक्षेततेची संपूर्ण जबाबदारी विमानतळ प्रशासन आणि हवाई कंपन्यांची असते. प्रवासी विमानतळावर गेल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये सर्व छायाचित्रीकरण होत असते. बॅगेत काय आहे, हेदेखील तपासतणीदरम्यान आढळून येत असते. त्यामुळे प्रवाशाने केलेल्या दाव्यानुसार संबंधित घटनेच्या कालावधीनुसार ठिकाणांची छायाचित्रे तपासून सर्व घटनाक्रम लक्षात येऊ शकतो.’

पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्या म्हणण्यानुसार, ‘बॅगांमधील वस्तूंची तपासणी आणि वस्तू, ऐवज चोरीला गेल्याची घटना विमानप्रवासात घडली असल्यास विमानतळ प्रशासन जबाबदार नाही. सामानाच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी विमान कंपन्यांची आहे.’ आता या सगळ्यात ज्या प्रवाशाचे पैसे चोरीला गेले, त्याने नेमकी दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न निरुत्तरितच राहिला आहे. सध्या तरी पोलीस तपास करत आहेत. ‘चोरीच्या घटना घडल्यानंतर प्रवाशांनी तक्रार दाखल केल्यावर त्यानुसार तपास केला जातो. या घटनेचाही तपास सुरू आहे,’ असे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी सांगितले आहे.

यापूर्वीही काही घटना

विमानतळावर अशा प्रकारे घडलेली ही पहिलीच घटना नाही. पुणे ते दुबई विमानप्रवासात प्रवाशाच्या बॅगचे कुलूप तोडून ऐवज चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. पुणे ते दिल्ली या हवाई प्रवासातही रोकड चोरल्याची घटना उघडकीस आली होती. वास्तविक पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवानांचा बंदोबस्त आहे. तसेच, संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. तरीही, या घटना घडत आहेत. ‘यावर सध्या तरी एकमेव उपाय म्हणजे हवाई प्रवाशांनी महत्वाचा ऐवज, रोकड सामानात न ठेवणे आणि विमानतळावर गेल्यानंतर आणि नियोजित ठिकाणी उतरल्यानंतर सामानाची लगेच त्या ठिकाणीच तपासणी करून घेणे,’ असे धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले.

Story img Loader