राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशासक जितेंद्र कंडारेला इंदूर येथे अटक करण्यात आले. त्याला आज पुणे विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. इंदूर येथे एका वसतिगृहाच्या इमारतीत कंडारे वेषांतर करून राहत होता. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यातील ही मोठी कारवाई मानली जात असून, यामुळे घोटाळ्यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कमी दराने हितचिंतकांना विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तब्बल १,२०० कोटींचा हा घोटाळा असून, सध्या हे प्रकरण राज्यात गाजत आहे. या घोटाळ्यात मध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून पुणे पोलीस या दोघांचा शोध घेत होते. सुनील झंवर अजूनही फरार आहे. मात्र जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात आल्याने सुनील झंवर देखील लवकरच सापडेल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २४ नोव्हेंबर २०२० रोजी कंडारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच २५ नोव्हेंबरला पोलिसांनी जळगावमध्ये धरपकड केली होती. मात्र, या कारवाईची आधीच माहिती मिळाल्याने जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर हे प्रमुख संशयित आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस कंडारेचा शोध घेत होते. तपासादरम्यान कंडारेची सासुरवाडी इंदूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुणे पोलिसांचे एक पथक तिथे लक्ष ठेवून होते.

हेही वाचा- गिरीश महाजन यांच्याविरुद्ध सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये पुरावे; ललवाणींचा दावा

दरम्यान, कंडारे इंदूरमधील एका वसतिगृहामध्ये कंडारे लपलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीची पडताळणी करून घेतली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याला बेड्या ठोकल्या. दुपारी आणि रात्री या दोन वेळेलाच तो जेवणासाठी खाली उतरायचा. सोमवारी (२८ जून) रात्री तो जेवणासाठी खाली आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. कंडारेनं दाढी आणि मिशा वाढवल्या आहेत. त्यामुळे त्याचे रुप पूर्णपणे बदलले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठीच त्याने हे रूपांतर करून घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

भाईचंद हिराचंद रायसोनी म्हणजेच बीएचआर मल्टी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या संस्थेच्या देशभरात सात राज्यांमध्ये २६४ शाखा असून, २८००० हजार ठेवीदारांच्या ११०० कोटींच्या ठेवी आहेत. मुदत संपल्यावर देखील ठेवींच्या रकमा परत मिळत नसल्याने हा घोटाळा २०१५ मध्ये समोर आला होता. यावेळी भाईचंद हिराचंद संस्थेच्या तेरा संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी शासनाने या पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. या अवसायकाने भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या मालमत्ता लिलावात विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता या मालमत्ता काही ठराविक लोकांना मातीमोल भावात विकल्या गेल्या. या मालमत्ता विक्रीबाबतही सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार करुन बनावट दस्ताऐवज बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत करताना त्यांच्या मूळ रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन उर्वरित रक्कमेचा अपहार करण्यात आल्याच्या तक्रारी ठेवीदारांकडून करण्यात येत होत्या. या संदर्भात काही संचालकांसह अवसायकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही जणांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. यामध्ये जळगाव शहरातील व्यावसायिक भागवत भंगाळे, संजय तोतला, तर जामनेरमधील जयश्री मणियार, राजेश लोढा, छगन झालटे आणि भुसावळ इथल्या आसिफ तेली यांचा समावेश आहे.