पुणे : भारतीय स्वातंत्र्याची अमृतमहोत्सव पूर्ती, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे शंभराव्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेची रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल असा त्रिवेणी संगम साधत गुरुवारी (१९ डिसेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहकारनगर परिसरातील दशभुजा गणपती मंदिराजवळील फुलोरा मैदान येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सहजीवन व्याख्यानमालेत ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर मोहन भागवत संवाद साधणार आहेत, अशी माहिती सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी आणि रवींद्र खरे यांनी सोमवारी दिली. यंदाची नियमित व्याख्यानमाला जानेवारीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पुणे : शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरणात अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा

आणीबाणीनंतर म्हणजे १९७७ मध्ये वसंत व्याख्यानमालेत तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे व्याख्यान झाले होते. त्यानंतर ४७ वर्षांनी सहजीवन व्याख्यानमालेत सरसंघचालकांचे व्याख्यान आयोजित करण्याचा योग जुळून आला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat speech in pune on 19th december pune print news vvk 10 css