पुणे : ‘लोभ, लालूच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य आहे,’ असे सांगतानाच, ‘धर्म हा प्राचीन असून, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती होते आहे, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी भूमिका मांडली.

‘भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही,’ असेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले. सहजीवन व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. भागवत यांचे ‘विश्वगुरू (पान ४ वर) (पान १ वरून) भारत’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय तथा राजू कुलकर्णी, ‘ग्लोबल स्टॅटॅजिक पॉलिसी फाउंडेशन’चे संचालक डॉ. अनंत भागवत या वेळी उपस्थित होते. ‘भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना नैतिक प्रगती झाल्यास ‘विश्वगुरू भारत’ ही केवळ घोषणा किंवा स्वप्न राहणार नाही, तर येत्या २० वर्षांत भारत विश्वगुरूपदाला पोहोचलेला दिसेल,’ असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला.

Railway Minister Ashwini Vaishnav talk about third and fourth tracks on Pune-Lonavala railway line
पिंपरी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

हेही वाचा >>>पिंपरी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…

‘भारतीय प्राचीन, सनातन हिंदू राष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून, सत्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणून जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून राष्ट्रनिर्मिती झाली आहे. हा इतिहास कोणी तरी फायद्यासाठी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आजही दडविला जात आहे. या देशाची परोपकारी वृत्ती असून, श्रीलंका, मालदीव, लिबिया यातील उदाहरणांवरून ते दिसून आले आहे. देशाची परंपरा शाश्वत आहे. आमचेच खरे असे म्हणणारे आम्ही नाही. तसेच, आम्ही सर्वांविषयी श्रद्धा ठेवणारे आहोत. मात्र, आमच्या देवतांवर आक्रमण करून, अरेरावी करून कोणी मतांतर करणार असेल, तर ते चालणार नाही. बाहेरून आलेले काही लोक वर्चस्ववादासाठी आग्रही आहेत. मात्र, स्वतंत्र देशात राहायचे असताना वर्चस्ववादाची भाषा कशासाठी हवी,’ अशी विचारणा भागवत यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, ‘स्व’चा बोध आणि नागरी कर्तव्य या पंच परिवर्तन सूत्रांवर आधारी कार्यक्रम संघ राबविणार असल्याचे डॉ. भागवत यांनी या वेळी जाहीर केले

राज्यघटनेनुसार आचरण महत्त्वाचे’

देशाने निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार आचरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यघटनेला धरून प्रामाणिकपणे वाटचाल करावी लागेल. राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचे श्रद्धापूर्वक आचारण केले पाहिजे. या कर्तव्यांची समाजात आणि कुटुंबातही चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.

Story img Loader