पुणे : जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. पोलिसांनी अशा घटनांची वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार आणि महापुरूषांची बदनामी रोखावी, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी केली आहे.
हेही वाचा >>> Maharashtra Latest News Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
रा. स्व. संघ आणि संघ विचारांनी चालणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याच्या हेतूने समाजमाध्यमावर ‘आरएसएस संघराज’ नावाने बनावट खाते उघडण्यात आले. समाजमाध्यमातून राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर करपे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला आहे. हेतुपुरस्सरपणे संघाची बदनामी करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे करपे यांनी निवेदनात म्हटले आहे. .