IAS अधिकारी पूजा खेडकर यांना वाय.सी.एम रुग्णालयाने दिव्यांग सर्टिफिकेट दिल्याने वायसीएम रुग्णालयावर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याप्रकरणी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा >>> Pooja Khedkar : “खोट्या बातम्या पसरवून माझी बदनामी केली जातेय”, पूजा खेडकर यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “माझं काहीतरी…”
विजय कुंभार म्हणाले, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाने पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलं. ते देत असताना अनेक उणिवा आहेत, त्रुटी आहेत. पुढे ते म्हणाले, ज्या व्यक्तीला सर्टिफिकेट द्यायचं असत. त्या व्यक्तीचा ओळखीचा पुरावा म्हणून फोटो आयडेंटिटी प्रुफ द्यावं लागतं. पूजा खेडकर यांच्याबाबत रेशनकार्ड हा पूर्व गृहीत धरला आहे. सुप्रीम कोर्टाने आधीच सांगितलं आहे. रेशनकार्ड हा पुरावा गृहीत धरला जाऊ शकत नाही. पुढे ते म्हणाले, आधीची सर्टिफिकेट ही नगरची आहेत. औंधला तिथला पत्ता दिला, तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी पिंपरी- चिंचवडचा पत्ता दिला. हे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. पुढे ते म्हणाले, पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यापूर्वी हे तपासायला हवं होतं. ते त्यांना घाईत दिलं आहे. याप्रकरणी YCM रुग्णालयाने काय केलंय? याची चौकशी महानगर पालिका आयुक्तांनी करावी. पुढे ते म्हणाले, सर्व सामान्य नागरिकाने असं केलं असतं तर बनावट दाखले बनवले म्हणून जेलमध्ये टाकलं असतं, असंही ते म्हणाले.