पुणे : उन्हाची तीव्रता, वाढते तापमान आणि यामुळे धावत्या वाहनांना अचनाक लागणारी आग, या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजनांसर्दभात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) व्यावसायिक वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. वाहनांमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना आणि इतर सरकारच्या आदेशाचे पालन होत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषत: शालेय वाहनांपासून ते कंपन्यांच्या वापरासाठी लागणारी खासगी आणि अंतर्गत वाहने तसेच रिक्षा आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश असणार आहे.
हिंजवडी येथील एका कंपनीच्या वाहनाला आग लागल्याने चार व्यक्तींचा होरपळून मृत्यू घटला. ही घटना हेतुपूरस्सर असली, तरी संबंधित वाहनामध्ये आपत्कालीन परिस्थितीचा अभाव किंवा स्व संरक्षणासाठी वाहक-चालकाकडून प्रवाशांना पूर्वकल्पना देण्यात येते किंवा नाही, याचा पूर्णपणे अभाव असल्याचे प्राधमिकदृष्टा समोर आले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनांमध्ये देखील सुरक्षात्कम उपरणांचा अभाव असल्याच्या तक्रारी होत असतात. त्यातच दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अशा वाहनांना आग लागण्याचे प्रकार जास्त घडत असतात. त्यापार्श्वभूमीवर कागदपत्रांची पूर्तता असली, तरी परिवहन विभागाच्या निर्देशाप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे देखील तिककेच महत्वाचे आहे. त्या पार्श्वभूमीवर उपायोजनांच्या अनुषंगाने ‘आरटीओ’ प्रशासनाकडून तपासणी मोहीम हाती घेतली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ही तपासणी मोहीम टप्प्यांतर्गत करण्यात येणार असून पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये वाहनाचे स्वास्थ प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी), वाहन आणि रस्ते कर आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहेत. परंतु, वाहनामध्ये आग प्रतिबंधात्मक उपकरणे, त्या्ंची दिशा आणि उपलब्धतता, वेग नियंत्रणासाठीची यंत्रणा (स्पीड लिमीट कंट्रोल सिस्टीम), सीट बेल्ट, पूर्वसूचना देणारी यंत्रणा, इलेक्ट्रीक वाहनांमध्ये बॅरटीची सुविधा अचानक बंद करणारी यंत्रणा, आपत्कालीन दरवाजे-खिडक्या आणि त्यांचा सहजतेने होणारा वापर, आपत्कालीन परिस्थितीत सुटकेसाठी प्रवाशांना देण्यात येणारी पूर्वकल्पना आणि सेवा याबाबत आरटीओ पाहणी करणार आहेत. तसेच वाहनाची वेळोवेळी होणारी दरुस्ती देखभाल आणि वाहनाची दैनंदीन कार्यक्षमता आणि विशेषतः धोक्याची पूर्वसूचना देणारी प्रणाली आदी तपासणी करणार आहेत.
व्यावसायिक वाहनांची प्रतिवर्ष तपासणी करण्यात येते. चालक आणि मालकाकडून प्रवाशांच्या सुरक्षात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्यादृष्टीने पूर्तता होतच असते. ‘आरटीओ’कडून तपासणी करण्यास कुठलीही हरकत नाही. – बाबा शिंदे, अध्यक्ष, माल आणि प्रवासी वाहतूक संघटना, महाराष्ट्र राज्य
वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात पडताळणी करण्यासाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रवासी आणि वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. – स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.