पुणे : इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या विमानात बाॅम्ब ठेवल्याचा संदेश समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अफवा पसरविल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून समाजमाध्यमातील खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड

पुण्यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
election decision officer car fire, Disabled independent candidate,
दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना

हेही वाचा – पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना

याबाबत हिमांशू योगेश अगरवाल (वय २८) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ॲडमलान्झा ९७५१४ या नावाने समाज माध्यमात खाते वापरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या विविध विमानात बाॅम्ब ठेवण्यात आला आहे, असा संदेश पाठविण्यात आला. संबंधित संदेश आल्यानंतर त्वरीत या घटनेची माहिती लोहगाव विमानतळ प्रशासन, तसेच पोलिसांना कळविण्यात आली. बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विमानतळ, तसेच विमनाची तपासणी करण्यात आली. तेव्हा बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. अफवा परसविणारा संदेश प्रसारित करण्यात आल्यानंतर विमान प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले. तपासणी झाल्यानंतर विमानाने उड्डाण केले. गेल्या काही दिवसांपासून विमानात बाॅम्ब ठेवण्यात आल्याचे संदेश पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या संदेशामुळे प्रवाशांसह आणि विमान कंपन्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

Story img Loader