पुणे : ‘राज्यात नव्याने जिल्ह्याची निर्मिती केली जाणार नसून, बारामती स्वतंत्र जिल्हा नसेल. तसा कोणताही प्रस्ताव नाही. या अफवा आहेत,’ असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामती येथे मंगळवारी केले. राज्यात नव्याने काही जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार असून बारामती हा स्वतंत्र जिल्हा असेल, अशी चर्चा प्रसारमाध्यमातून होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती

टेंभुर्णी येथील एका खासगी कार्यक्रमासाठी बारामती विमानतळावर आले असताना माजी महसूलमंत्री आणि विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली. त्या वेळी त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. पालकमंत्रिपदाची नियुक्ती, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले,‘पालकमंत्रिपदाबाबत कुठेही नाराजी नाही. महायुतीचा प्रपंच मोठा आहे. राज्याच्या निर्मितीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच महायुतीला जनादेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. यासंदर्भात महायुतीचे नेते एकत्र बसून मार्ग काढतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत. गावी गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते नेहमीच गावी जातात. त्यामुळे ते नाराज असण्याचा प्रश्नच नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rumors of creation of separate baramati district says minister radhakrishna vikhe patil pune print news apk 13 zws