पुणे : मंगळवार पेठ येथील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्याने घबराट उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले असून ते मूळचे बिहारचे असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. कमला नेहरू रुग्णालयात चार संशयित फिरत असल्याची माहिती एका नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने तपास सुरू केला पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून ते मूळचे बिहारचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडे आधार कार्ड सापडले असून ते सध्या लोहिया नगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्याने घबराट उडाली. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच रुग्णालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या नागरिकांना काही वेळ बाहेर थांबवण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rumors of terrorists entered in kamla nehru hospital in pune city pune print news rbk 25 asj