लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: चिंचवडमधील संभाजीनगर येथे धावत्या ओमीनी मोटारीने शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पेट घेतला. मोटारीतील चालकाने उडी मारली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मोटारीतील लॅपटॉप, इतर साहित्य जळाले.

Hit and run in Koregaon Park area bike rider dies in collision with speeding car
कोरेगाव पार्क भागात ‘हिट अँड रन’, भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
child died in a collision with a municipal garbage truck in Govandi Mumbai news
गोवंडीमध्ये महापालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू
Heavy rain in Nagpur, rain Nagpur, weather Nagpur,
नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी
person Murder in Chinchwad,
VIDEO: चिंचवडमध्ये हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
mira road police suicide
मीरा रोड मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
roof of building collapsed at Grant Road possibly trapping some people under debris
ग्रॅन्ट रोड येथे इमारतीचे छत कोसळले, मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता
Navapada, illegal building at Navapada,
सामासिक अंतर न सोडता डोंबिवलीतील नवापाड्यात आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी

मोटार थरमॅक्स चौकाकडून केएसबी चौकाकडे जात होती. संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल शाळेजवळ मोटारीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने उडी मारली. मोटार पेटल्याने धुराचे लोट हवेत पसरले होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. बघ्यांनी गर्दी केली होती.

आणखी वाचा-पुणे: दहीहंड्यांचा ‘आवाजी’ उच्छाद; शहर, उपनगरांमध्ये दणदणाटाने नागरिक हैराण

याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र, बंब घटनास्थळी येईपर्यंत मोटार जळाली. मोटारीने पेट घेताच चालकाने प्रसंगावधान दाखवत उडी मारली. त्यामुळे कुठलीही इजा झाली नाही. परंतु गाडीमध्ये असलेला लॅपटॉप व इतर सामान जळाल्याचे प्रत्यक्षदर्शी अमित गोरखे यांनी सांगितले.