विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी दरेकरांनी केली होती. दरम्यान आता या विरोधात तक्रार दाखल झाल्याने दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी होती. कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केला आहे, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपाली चाकणकर म्हणाल्या “गेल्या दोन वर्षापासून भाजपा महाराष्ट्रातील एकतेला आणि परंपरेला नख लावायचं काम करत आहे. सातत्याने महाराष्ट्राची बदनामी कशी करता येईल, याकडे त्यांच जास्त लक्ष आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी अतिशय खालची राजकारणाची पातळी भाजपाने गाठली आहे. प्रवीण दरेकर यांनी अतिशय अश्लिल असे विधान केलं. जाहीर सभेत बोलत असतांना महिलांना लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. दरेकर यांनी यावर माफी मागने अपेक्षीत होते. मात्र मी या गोष्टीला ऐवढं महत्व देत नाही, असे दरेकर म्हणाले होते. त्यामुळे या प्रकरणी मी तक्रार दिली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळेल, असा विश्वास आहे.”

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशापुर्वी प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे अशी टिपण्णी दरेकरांनी केली होती. 

“गाल सर्वांनाच रंगवता येतात,” रुपाली चाकणकरांच्या ‘त्या’ टीकेला प्रवीण दरेकरांनी दिलं उत्तर

काय म्हणाले होते दरेकर ?

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali chakankar aggressive against praveen darekar statement filed complaint sinhagad police station srk