पुणे : देशभरात भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत असून पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने गंज पेठेतील अग्निशामक विभागाच्या मुख्य कार्यालयात भाऊबीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,आमदार रवींद्र धंगेकर, आयोजक मिलिंद भोई यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.तर यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना ओवाळून भाऊबीज साजरी करीत दोन्ही नेत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा-पुणे : मिळकतकरातील ४० टक्के सवलत योजनेला मुदतवाढ; ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा

यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मागील १६ वर्षापासून अग्निशामक विभागाच्या भाऊबीज कार्यक्रमाला येते. त्या निमित्ताने सर्वांसोबत संवाद साधणे शक्य होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात काम करण्यास एक ऊर्जा मिळते अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आज या कार्यक्रमा दरम्यान भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना ओवाळले आहे. पण माझे बंधू जयंत पाटील यांना डेंग्यू झाला असून ते आजारी आहेत. ते लवकर बरे होतील, तसेच मला जयंत पाटील यांनी फोन करून भाऊबीज सणाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचं त्यांनी सांगितले.

Story img Loader