पुणे प्रतिनिधी: पुणे महानगरपालिकेतील हिरकणी कक्षाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी रुपाली चाकणकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही भाजपमधून खडकवासला मतदार संघातून लढणार असल्याची चर्चा आहे. असे विचारले असता त्या म्हणाल्या की, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये अनेक पदावर काम केलं आहे. तसेच ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की, मी दुसऱ्या पक्षातून इच्छुक आहे त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या, या गोष्टी तुमच्याकडूनच मला समजतात.”
त्या पुढे म्हणाल्या, “शरद पवार यांनी सर्व सामान्य कुटुंबातील एका महिलेला राज्य महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल पवार साहेबाची मी आभारी असून मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे” अशी भूमिका मांडत इतर चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.