Rupali Patil Thombare on Ravindra Dhangekar : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरदाव वेगाने पोर्श कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काही तासांनी आरोपीला जामिनावर मुक्त करण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर या प्रकरणावरून पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सातत्याने गृह विभाग, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, आमदार धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हात पाय बांधून पळायला लावलं आहे, अशी टीका केली होती. धंगेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली ठोंबरे यांनी फेसबूकवर यासंदर्भात एक पोस्ट लिहून धंगेकरांना राजकारण न करता पुण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा