शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर शीतल म्हात्रेंनी हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप करत पोलीस तक्रारी केली. त्यावरून गुन्हा दाखल झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या रविवारी (१२ मार्च) माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ आहे किंवा नाही हे तपासावं आणि ज्याने व्हिडीओ व्हायरल केला असेल त्याच्यावर कारवाई करावी. शीतल म्हात्रेंना मला सांगायचं आहे की, त्यांनी जे पेरलं ते उगवताना दिसत आहे. त्याचाच त्यांना त्रास होत आहे. आम्ही विरोधक महिला असलो तरी या गोष्टींना थारा देणार नाही.”

“महिलेचा असा मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय”

“शीतल म्हात्रेंनी सांगितलं की, तो व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. एखाद्या महिलेचा असा मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय आहे. ज्याने हे केलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मात्र, भाजपा आणि शिंदे गटाने अशा इतर अनेक महिलांचे व्हिडीओ टाकण्यात आले त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळेच समाजात ही हिंमत वाढली आहे,” असं मत रुपाली ठोंबरेंनी व्यक्त केलं.

“राजकीय महिला मिरवणुकीत असं कृत्य करणार नाही”

रुपाली ठोंबरे पुढे म्हणाल्या, “हा व्हिडीओ खरा आहे की खोटा हे तपास केल्याशिवाय कळणार नाही. मला वाटतं की, मुळात राजकारणी महिला अशाप्रकारच्या मिरवणुकीत असं कोणतंही कृत्य करताना दिसणार नाहीत याची खात्री आहे. वाईट वाटलं की, एखाद्या महिलेचा असा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.”

हेही वाचा : VIDEO: “आमदार प्रकाश सुर्वेंबरोबरचा व्हिडीओ ‘मॉर्फ’”, शीतल म्हात्रे म्हणाल्या, “विकृत नजरेने…”

“भाजपा-शिंदे गटातील लोकांनी व्हिडीओ व्हायरल केला नाही ना हे तपासा”

“शीतल म्हात्रेंना वाटत असेल की हे विरोधकांनी केलं. मात्र, मला त्यांना सांगायचं की, त्यांच्या गटातील आणि ते सत्तेत ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्या लोकांनी हा व्हिडीओ व्हायरल केला नाही ना याचा तपास झाला पाहिजे,” अशी मागणी रुपाली ठोंबरेंनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali thombare comment on viral video of sheetal mhatre prakash surve pbs
Show comments