रुपी बँकेचे विलीनीकरण नव्हे, तर पुनरुज्जीवन करण्यात यावे व नवीन पूर्ण वेळ प्रशासक मंडळाची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसाठी पुणेकर नागरिक कृती समितीच्या पुढाकाराने बँकेचे ठेवीदार व खातेदार मंगळवारी सहकार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी याबाबतची माहिती दिली. रुपी बँकेच्या प्रशासकांनी बँकेचे कार्पोरेशन बँकेमध्ये विलीनीकरण होणार असल्याचे सांगत ठेवीदारांबरोबरच मुख्यमंत्री, पालकमंत्री, सहकाय आयुक्त या सर्वाची फरवणूक केली असल्याचा आरोपही समितीने केला आहे. रुपी बँकेचा तोटा सहन करण्याची ताकद कोणत्याही बँकेत नसल्याचे स्पष्ट दिसत असतानाही ठेवीदारांना दिवास्वप्न दाखवून वेळकाढूपणा करण्यात आला. रुपी बँकेला विलीनीकरण हे औषध नसून, बँकेचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. त्यातील अडथळा दूर करण्यासाठी सध्याच्या प्रशासकांना हटवून नवीन पूर्ण वेळ प्रशासक मंडळाची नेमणूक करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
‘रुपी’च्या ठेवीदारांचा उद्या मोर्चा
रुपी बँकेचे विलीनीकरण नव्हे, तर पुनरुज्जीवन करण्यात यावे व नवीन पूर्ण वेळ प्रशासक मंडळाची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसाठी...
First published on: 25-05-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupee bank march administrator