ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांची अपेक्षा
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कला फुलते. अशा वेळी ती हुशारी खेडय़ातील मातीतच वाया घालवायची का, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी केला. ग्रामीण भागातील कलेला उत्तम व्यासपीठ मिळाल्यास रंगभूमी वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त कुलकर्णी यांच्या हस्ते विविध कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. नाटय़ परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, दीपक रेगे, मेघराज राजेभोसले, अविनाश देशमुख, निकिता मोघे, शाहीर दादा पासलकर, मकरंद टिल्लू या वेळी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’तील ‘नामवंतांचे बुकशेल्फ’ सदरासाठी शब्दांकन करणारे वीरेंद्र विसाळ यांना गो. रा. जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलकर्णी म्हणाले, रंगभूमी जिवंत ठेवत असताना कलाकारांना रोजच्या अडचणी भेडसावत असतात. अठरा पगड जातीच्या कलाकारांनी गावोगावी िहडून रंजन आणि प्रबोधन केले. या लोककलाकारांची अवस्था बिकट आहे. सध्या लोककला लोप पावत आहेत. त्यांच्या मानधनाचा प्रश्न आहे. या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही. कलाकारांवर अशी वेळ यावी हे दुर्दैव आहे. अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण शालेय स्तरावरून देतानाच शिक्षण जीवनाभिमुख असायला हवे.भोईर यांनी मनोगत व्यक्त केले.
परिषदेचे यंदा दिलेले पुरस्कार असे
’ नटवर्य केशवराव दाते पुरस्कार – डॉ. राम
’ साठय़े, मधुकर टिल्लू पुरस्कार – डॉ. विश्वास
’ मेहेंदळे, माणिक वर्मा पुरस्कार – अशोक काळे
’भार्गवराम आचरेकर पुरस्कार – मधू गायकवाड]
’ बबनराव गोखले पुरस्कार – चंद्रकांत काळे
’ सुनील तारे पुरस्कार – सिद्धेश्वर झाडबुके, गो. रा. जोशी
’ डॉ. वि. भा. देशपांडे पुरस्कार – वीरेंद्र विसाळ
’यशवंत दत्त पुरस्कार – चैतन्य देशमुख
’ पाश्र्वनाथ आळतेकर पुरस्कार – दीपक रेगे,
’छोटा गंधर्व पुरस्कार – सुरेंद्र गोखले
’ रमाबाई गडकरी पुरस्कार – प्रतिमा रवींद्र काळेले
’ दिवाकर पुरस्कार – नंदकुमार भांडवलकर
’ वसंतराव देशपांडे पुरस्कार – श्रद्धा सबनीस
’ वसंत शिंदे पुरस्कार – आशुतोष वाडेकर
’ राम नगरकर पुरस्कार – पराग चौधरी
’परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार – राजेश बारबोले
’गंगाधरपंत लोंढे पुरस्कार – डॉ. संजीवकुमार पाटील
’ मनोरमा नातू पुरस्कार – आशुतोष पोतदार
’ पु. श्री. काळे पुरस्कार – रवी पाटील
’ राज्य नाटय़ स्पर्धा उत्कृष्ट अभिनय – जयदीप मुजुमदार आणि शर्वरी जाधव
’ उत्कृष्ट दिग्दर्शन – सुबोध पंडे
’ नाटय़निर्मिती – प्रयोग पुणे