पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक केल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: सासरच्या छळामुळे तरूणाची आत्महत्या; पत्नीसह सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध गुन्हा

ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. सुळे यांच्या समाजमाध्यमातील खाते हॅक करण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. समाजमाध्यमातील खाते हॅक करून हॅकरने ४०० डाॅलरची मागणी केली. याबाबतचा संदेश प्रसारित झाल्यानंतर सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत समाजमाध्यम चालक कंपनीशी संपर्क साधला. सुळे यांच्या समाजमाध्यमातील खात्याचे नियंत्रण हॅकरकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले. सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते पूर्ववत झाले आहे. हॅकरने सुळे यांच्यासह आणखी कोणाचे खाते हॅक केले का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.