लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील भोर मतदारसंघात शांततेत मतदान झाले. दुपारी तीनपर्यंत भोर-वेल्ह्यात ३८ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी झाली. मुळशीतील पौडसह विविध गावात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजाविला. भोर, वेल्हा, मुळशी भागात मतदानाच्या पहिल्या टप्यात फारसा उत्साह नव्हता. ऊन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदारांची मतदान केंद्रात गर्दी होऊ लागल्याचे पाहायला मिळाले. भोर शहरातील मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली होती. भोरमधील मतदान केंद्रांवर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आणखी वाचा-बारामती मतदारसंघात तीन वाजेपर्यंत किती टक्के झाले मतदान?

वेल्ह्यातील विंझर, गुंजवणी खोऱ्यात, राजगड पायथा, वाझेघर पाली, दापुडी, अंतरवली, मार्गासनी, आंबावणे, करंजावणे गावातील मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. वेल्ह्यातील मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. खेड-शिवापूर, नरसरापूर, राजगड पायथा, शिवगंगा खोऱ्यातील मतदान केंद्रावर दुपारनंतर गर्दी झाली होती. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. दुपारी तीनपर्यंत भोर मतदार संघात ३८ टक्के मतदान झाले होते.

मुळशीतील पौड, मारणेवाडी, मुठा, आंदगाव, भुकूम, बेलावडे, खेचरे, चिंचवड-आंदेश, कोंढवळे, माले, शेरे, कोंढूर, संभवे या गावातील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मुळशीतील मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुळशी तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.

Story img Loader