पुणे : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या जागावाटपा बाबत ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर म्हणाले की,मी संपर्कप्रमुख असून माझ्या पक्षाला एकही जागा लढवता आली नाही. त्यामुळे मी देखील नाराज असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच ते पुढे म्हणाले की,भाजपच्या दोन्ही जागेवर आम्हाला उमेदवारी मिळणार नसेल तर आम्ही यापुढे कुठे उमेदवारी मागयाची मी चेतन तुपे आणि सुनील शेळके यांना देखील हेच विचारलं.जिकडे भाजपचे आमदार होते तिकडेच उमेदवारी मागण्याची आमची अपेक्षा होती.पण महाविकास आघाडी म्हणून भाजपला दूर ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

हेही वाचा >>> मी स्टार प्रचारक हे आत्ताच कळलं…डॉ.अमोल कोल्हे यांचे वक्तव्य

आम्हाला आणि आमच्या शिवसेना पक्षाला संपावण्याची भाषा ज्या भाजपने केली आहे. आमच्या पक्षात फूट पाडून चिन्ह गोठवण्याचा प्रकार करणाऱ्या पक्षाला हरवण्यासाठी दोन पावलं मागे घेण्याची भूमिका आम्ही घेतली आहे.त्याला आमचा पाठिंबा आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीला निवडून आणण्यासाठी निरधाराने उतरलो असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली. कसबा विधानसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे नाराज होते.त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.ते देखील यावेळी सचिन अहिर यांच्या सोबत होते.तोच धागा पकडत सचिन अहिर म्हणाले की,माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाहिलं.तर कसब्यामध्ये कोणी नाराज आहे आणि कोण नाही.हे लगेच समजून जाईल.अनेक वेळा नाराजीचा अर्थ काही लोक वेगळा काढतात.अशी नाराजी नाटयावर त्यांनी भूमिका मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin ahir upset for not get seats to contest in chinchwad and kasba by elections zws 70 svk