पुणे : मराठा समाजाच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाचा अनुशेष भरून निघेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये पूर्वी मी काम केले आहे. त्यामध्ये माझेही काही योगदान आहे. मागील सरकारच्या काळात भरून न निघालेला अनुशेष या सरकारच्या काळात भरून निघेल. या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन करायचे, असेही डाॅ. मोरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadanand more comment on government decision over maratha reservation pune print news vvk 10 pbs