पुणे : क्वीन्स गार्डन परिसरातील साधू वासवानी पूल पाडून तो नव्याने उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी ८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव महापालिका प्रशानसाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.कोरेगांव पार्कपासून बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा करण्याचे नियोजित आहे. त्याअंतर्गत साधू वासवानी पूल पाडण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात (२०२३-२४) २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी कॅशेक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांची तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साधू वासवानी पूल पाडून नव्याने बांधण्यासाठी ८३ कोटींचा खर्च अपेक्षित असून एसएमसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. साधू वासवानी पूलाचे काम पावसाळ्याचा कालावधी वगळता दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुलाच्या कामासाठी लागणारी तरतूद टप्प्याटप्प्याने अंदाजपत्रकात उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.