पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सर्व जलतरण तलावांचे सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्याची तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅसगळती झाल्याची सकाळी घटना घडली. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पोहोण्यासाठी आलेले नागरिक, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक अशा २२ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. उपचारार्थी नागरिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, या दुर्घटनेत खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने करावा. महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व जलतरण तलावांचे सुरक्षा ऑडिट करावे. भविष्यात अशी घटना समोर येऊ नये. यासाठी प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी. तसेच, दोषींवर कारवाई करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली.

हेही वाचा – पुणे : लेझर बीमच्या विरोधात ग्राहक पंचायतीची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

हेही वाचा – पुणे : तारांकित हॉटेलमधील जलतरण तलावात बुडून प्राध्यापकाचा मृत्यू

कासारवाडी जलतरण तलावावर गॅस गळती झाल्याची घटना घडली. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णालयात दाखल करावे लागले. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. महापालिका प्रशासनाने गांभीर्याने या घटनेची चौकशी करावी. तसेच, सर्वच जलतरण तलावावरील संबंधित ठेकेदार, एजन्सी यांना सुरक्षा ऑडिट बंधनकारक करावे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशी सूचना प्रशासनाला केली असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safety audit of swimming pools in pimpri pune print news ggy 03 ssb