लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामती : केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजाविण्यासाठी साहिल बोराटे हा युवक थेट लंडनहून मंगळवारी बारामतीमध्ये पोहोचला. मतदान केल्यानंतर मंगळवारी रात्रीच तो लंडनला परतणार आहे.

‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाचेच मत महत्वाचे आहे. सर्वाचा सहभाग हाच लोकशाहीचा खरा भक्कम पाया आहे. प्रत्येक मतदारांने  मतदान करणे हे आपले परम कर्तव्य आहे आणि हे  लोकशाहीनेच  दिलेला आपला अधिकार बजावण्यासाठी मी लंडनहून आलो असल्याचे साहिल याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  

आणखी वाचा-पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, मंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान

‘मतदान हे लोकशाहीसाठीच’ या ब्रीदवाक्यानुसार साहिल संजीव बोराटे (रा. शिर्सूफळ, ता. बारामती) हा युवक बारामती येथे मंगळवारी मतदान केंद्रावर पोहोचला. तो  युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल येथे ‘मास्टर इन ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम करीत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान करून रात्रीच पुन्हा लंडनला जाण्यासाठी रवाना होणार असल्याचे साहिलचे वडील संजीव बोराटे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahil borate reached baramati from london to vote pune print news vvk 10 mrj