पुणे : प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या पुस्तकास साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. देशातील २२ भाषांमधील बालसाहित्यकारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये मराठी भाषेसाठी डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या साहित्यकृतीला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र संतांची भूमी, जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत- राज्यपाल कोश्यारी

साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे, अशी भावना डॉ.संगीता बर्वे यांनी व्यक्त केली. मुलांनी दैनंदिनी लिहावी या उद्देशाने ‘पियूची वही’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे अनेक मुलांनी दैनंदिनी लिहिण्यास सुरूवात केली आहे. त्याचाही मोठा आनंद आहे. या पुरस्कारामुळे हे पुस्तक आणखी मुलांपर्यंत पोहोचेल आणि ते वाचून मुले रोजचा दिनक्रम लिहिण्यास सुरूवात करतील. मुलांनी लिहिते व्हावे हाच या पुस्तक निर्मितीमागचा असलेला हेतू साध्य झाला आहे. मुले मोठ्या संख्येने लिहिते होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे, असे बर्वे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya akadami award declared dr sangita barve in piuchi wahi tmb01