पुणे : साहित्य अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला असून शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर येथील देविदास सौदागर यांची ‘उसवण’ कादंबरी युवा पुरस्काराची मानकरी ठरली आहे. विविध भाषांतील बालसाहित्य तसेच युवा पुरस्कारांची घोषणा साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी शनिवारी केली. यामध्ये असामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्ऩड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, राजस्थानी, संताली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषेतील लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. संसकृत भाषेतील पुरस्कारांची घोषणा नंतर केली जाणार आहे.

मराठीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला असून शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर येथील देविदास सौदागर यांची ‘उसवण’ कादंबरी युवा पुरस्काराची मानकरी ठरली आहे. सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. शरणकुमार लिंबाळे, किरण गुरव आणि श्रीकांत उम्रीकर यांच्या परीक्षक समितीने मराठी भाषेतील युवा पुरस्काराच्या साहित्यकृतीची निवड केली.

success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Competitive Exams Plan B for Competitive Exams
माझी स्पर्धा परीक्षा: स्पर्धा परीक्षांचा ‘प्लॅन बी’
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
Loksatta career mantra Science Engineer UPSC Guidance
करिअर मंत्र
Loksatta career mantra PGDBM corporate company Short term courses
करिअर मंत्र
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड
ias g shrikant guidance on competitive exam preparation
माझी स्पर्धा परीक्षा : स्पर्धा परीक्षा का द्यायची, स्पष्टता हवी

हेही वाचा : पुणे: सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन महिला ताब्यात

साहित्य अकादमीचा पुरस्काराचा आनंद

बालसाहित्याच्या लेखनासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला आहे. प्रत्यक्षात अनेक वर्षे मी बालसाहित्य लिहित आहे. समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीतील पात्र जाणीवपूर्वक निर्माण करून कुमार आणि किशोरवयीन मुलांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न केला. निर्माण केलेल्या पात्राच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांना बुद्धिचातुर्य कथा सांगण्याचा प्रयत्न मी ‘समशेर आणि भुतबंगला’ कादंबरीतून केला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून कादंबरीतील हे पात्र रूजले आहे, याचाही आनंद आहे. या कादंबरीतील काही भाग ‘साधना’च्या अंकात प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे साधना अंकासाठीच काही भाग लिहिले आहेत.

भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक

भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक