पुणे : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ संशोधक-विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. कटक येथील ओडिशा रॅशनलिस्ट सोसायटीचे राज्य सचिव देबेंद्र सुतार यांना डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 

नाशिक येथील ‘धरणसुक्त’ कादंबरीचे लेखक विलास शेळके यांना (ललित लेखन), ’माणूस ‘असं का वागतो’?’ या पुस्तकाच्या पुण्यातील लेखिका अंजली चिपलकट्टी (वैचारिक लेखन) आणि कणकवली येथील“रंगवाचा’ त्रैमासिकाचे संपादक वामन पंडित यांना रा. शं. दातार नाट्य पुरस्कार असे ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर, ‘बेबाक कलेक्टिव्ह’ या आंतर्छेदीय स्त्रीवादी दृष्टिकोनातून मूलतत्त्ववादी आणि दडपशाही शक्तींविरोधात संघर्ष करणाऱ्या संस्थेच्या मुंबईतील कार्यकर्त्या हसीना खान आणि सिंधुदुर्ग येथील मनोविकारतज्ज्ञ डाॅ. रूपेश पाटकर यांना समाजकार्य कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Sharad Pawar on RSS Cadre
Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…

हेही वाचा…मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना

एस. एम. जोशी फाउंडेशन येथे १८ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती या पुरस्कारांचे संयोजन करणाऱ्या ‘मासूम’ संस्थेच्या डाॅ. मनीषा गुप्ते आणि ‘साधना ट्रस्ट’चे विश्वस्त विनोद शिरसाठ यांनी शनिवारी दिली. साहित्य पुरस्काराचे समन्वयक मुकुंद टाकसाळे या वेळी उपस्थित होते.

Story img Loader