पुणे : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या चिंचवडमधील तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. तरुणाकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

निलेश हिरानंद वीरकर (वय ३३, रा. विष्णू गावडे चाळ, चिंचवड रेल्वे स्थानकासमोर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने बनावट नोटा कोठून आणल्या, यादृष्टीने तपास सुरु आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल पवार, महेश मंडलिक गस्त घालत होते. त्यावेळी पीएमपी थांबा परिसरातून वीरकर गडबडीत निघाला होता. पवार आणि मंडलिक यांना संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरु केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या. चौकशीत नोटा बनावट असल्याचे आढळून आले.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा

हे ही वाचा…झाडे तोडण्याबाबत पुन्हा चूक झाल्यास दंडात्मक कारवाई, ‘राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणा’ने महापालिकेस फटकारले

वीरकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पद्मनाळे यांनी ही कारवाई केली.