पुणे : रायगड जिल्ह्यातील आंबे शिवथर येथील सह्याद्रीवाडी या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेची अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने पुनर्बांधणी केली आहे. ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी आणि राज्यभरातील अनेक दानशुरांच्या मदतीच्या आधारे या शाळेची पुनर्बांधणी करण्यात आली असून, आता नव्या शैक्षणिक वर्षापासून नव्याने उभारलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे वर्ग भरतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने शाळेच्या पुनर्बांधणीबाबतची माहिती दिली. पुनर्बांधणी केलेल्या शाळेचे लोकार्पण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लोकसाधना सेवा संस्थेचे संस्थापक डॉ. राजा दांडेकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष हृषिकेश यादव, ज्येष्ठ पदाधिकारी राजन बागवे, किरण देशमुख, राहुल मेश्राम, रायगड जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष धनंजय मदन, विश्वेश महाजन, खोपोलीच्या यशवंती हायकर्सचे अध्यक्ष पद्माकर गायकवाड, सह्याद्रीमित्र महाडचे डॉ. राहुल वारंगे, शलाका वारंगे,अमोल वारंगे, संकेत शिंदे, भूषण शेठ, शाळेचे शिक्षक रवींद्र जेधे आदी या वेळी उपस्थित होते.

गेल्यावर्षी जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर, भूस्खलनासारख्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा गिर्यारोहण संघटना पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य करत होत्या. आंबे शिवथर येथील सह्याद्रीवाडी येथेही दरड कोसळून काही घरांचे आणि शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शाळेतील शिक्षक रवींद्र जेधे यांनी जवळच एका झोपडीत शाळा भरवण्यास सुरुवात केल्याची माहिती महाडच्या सह्याद्रीमित्र संस्थेच्या निदर्शनास आली. त्यानंतर या शाळेसाठी वर्ग बांधून देण्याचे काम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हाती घेतले, तर सह्याद्रीमित्र संस्थेने या शाळेच्या बांधणीच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यानुसार सहा महिन्यांत शाळेचे बांधकाम करण्यात आले.