पुणे : शहरातून तडीपार केल्यानंतर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गांजा, चरस असे साडेपाच लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : राहुल गांधीच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शहरात भाजपच्या वतीने आंदोलन

हेही वाचा >>> भोरजवळ खासगी बसचा टायर फुटून अपघात; घटनेत कोणतीही जीवितहानी नाही; बस प्रवासी जखमी

लाॅरेन्स राजू पिल्ले (वय ४२), ऋषिकेश जगदीश भोजणे (वय ३२, दोघे रा. गोपाळपट्टी, मांजरी), मंगेश सुनील पवार (वय ३२, रा. हर्षद अपार्टमेंट, ससाणेनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लाॅरेन्स पिल्लेला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी २८ जानेवारी रोजी शहरातून तडीपार केले होते. तडीपार आदेशाचा भंग करुन लाॅरेन्स मांजरी भागात वावरत होता. लाॅरेन्स, त्याचे साथीदार ऋषीकेश, मंगेश अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने हडपसर भागातील काळेपडळ परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजा आणि १२० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, तृप्ती खळदे, वसीम सय्यद, गिरीधर एकोर्गे आदींनी ही कारवाई केली.